
ई-केवायसी पूर्ण झाला असेल तर लाभार्थ्याला रक्कम मिळण्यास अडचण येत नाही. खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तरच खात्यात पैसा येईल.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर लॉगईन करा. या ठिकाणी उजव्या बाजूला Farmers Corner हा पर्याय निवडा. Beneficiary Status हा पर्याय निवडा. या ठिकाणी आधार क्रमांक, बँक खात्याचा तपशील यापैकी एक निवडा, माहिती जमा करा.खात्यात रक्कम जमा करण्यात आली की नाही याची माहिती मिळेल. अथवा Know Your Status हा पर्याय निवडा. रजिस्ट्रेशन नंबर टाकून स्टेटस चेक करा.

Know Your Status हा पर्याय निवडल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर मोबाईल क्रमांक नोंदवा. Captcha निवडा. मोबाईलवरील ओटीपी टाका. त्याआधारे आता तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक माहिती होईल. त्यानंतर होमवर जाऊन Know Your Status वर क्लिक करा. पुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक टाका.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेतंर्गत 17 वा हप्ता जमा करण्यास मंजुरी दिली आहे. त्याची रक्कम जवळपास 20,000 कोटी रुपये आहे. ही रक्कम 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6000 रुपये जमा होतात.

तुमचे नाव यादीत नसल्यास पीएम किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266 पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092 , 011-23382401 पीएम किसान हेल्पलाईन : 155261, 18001155266 पीएम किसान नवीन हेल्पलाईन क्रमांक : 011-24300606, 011-24300606 यावर कॉल करा.