
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत देशातील कोट्यवधी पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची मदत केली जाते. हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांनी एकूण तीन टप्प्यात दिले जातात. प्रत्येक टप्प्यात 2000 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना एकूण सहा हजार रुपयांचे वाटप केले जाते.

आता देशातील शेतकऱ्यांना 22 वा हप्ता मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा हप्ता देण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाची पूर्ण तयारी झालेली आहे. त्यामुळेच हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

केंद्र सरकार येत्या 1 फेब्रुवारी रोजी 2026-2027 या सालासाठी आर्थिक संकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पानंतर सरकार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शेतकरी सन्मान योजनेचा 22 वा हप्ता पाठवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मार्च ते एप्रिल 2026 या काळात कधीही 2000 रुपये पाठवले जातात. शेतकऱ्यांना 21 वा हप्ता नोव्हेंबर 2025 रोजी मिळाला होता. सरकार सामान्यतं प्रत्येक चार महिन्यानी एका हप्त्याची घोषणा करते.

म्हणजेच हप्ता नेमका कधी मिळणार, याची घोषणा प्रत्येक चार महिन्यांतून एकदा केली जाते. दरम्यान, या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. केवायसीमध्ये आधार क्रमांक हा बँक खात्याशी जोडला जातो.