
आज, 21 जून रोजी देशभरात 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. यावेळी “योगा फॉर वन अर्थ, वन हेल्थ” ही थीम आहे. या खास प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाखापट्टणममध्ये 3 लाख लोकांसोबत योग केला.

योग लोकांना जगासोबत एकतेकडे घेऊन जातो, जिथे आंतरिक शांती ही एक जागतिक धोरण बनते. आंतरराष्ट्रीय योग दिन मानवतेच्या प्राचीन पद्धतीची सुरुवात आहे असे भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले.

जिथे लोक आपला दिवस योगाने सुरू करतील. जिथे योग मानवतेला एकत्र बांधण्याचे माध्यम बनेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केलं.

विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.

21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव जेव्हा भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये मांडला तेव्हा त्याला 175 देशांचा पाठिंबा मिळाला.

आज योग जगभरातील कोट्यावधी लोकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

सिडनी ऑपेरा हाऊस असो, माउंट एव्हरेस्ट असो किंवा समुद्राचा विस्तार असो, योग हाँ सर्वांसाठी आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

योग ही एक उत्तम वैयक्तिक शिस्त आहे, ती एक अशी प्रणाली आहे जी लोकांना "मी" पासून "आपण" पर्यंत घेऊन जाते आणि मानवतेला श्वास घेण्यासाठी, संतुलित होण्यासाठी आणि पुन्हा पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले हे विराम बटण आहे.

पंतप्रधान मोदींनी नंतर स्वयंसेवकांसोबत योगासनं केली. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया अकाऊंटलरही खास पोस्ट केली. योग हा केवळ एक व्यायाम नाही, हा जीवन जगण्याचा एक मार्ग अशा शब्दांत त्यांनी योगाचे वर्णन केलं.