
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाना आणि मिझोरम या पाच राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या प्रचारासाठी सर्वत पक्षांनी तयारी सुरु केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या तेलंगणामध्ये आहेत. तेलंगणातील विविध ठिकाणी ते भेटी देत आहेत.

तेलंगणामध्ये काँग्रेसची त्सुनामी येत आहे. तेलंगणातील जनतेची सगळी स्वप्न पूर्ण होतील, असा शब्द राहुल गांधी यांनी यावेळी दिला.

तेलंगणातील एका छोट्या दुकानात थांबत राहुल गांधी यांनी चहा घेतला. विश्रांतीसाठी चहाच्या या दुकानात थांबल्याचा आनंद झाला!, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

प्रचारादरम्यान नाश्त्यासाठी एका छोटेखानी हॉटेलमध्ये राहुल गांधी थांबले. दक्षिणेकडील प्रसिद्ध डोसाही राहुल गांधी यांनी बनवला. त्याचा हा फोटो...