राज्यपाल कोश्यारी आज सोलापूर दौऱ्यावर; आसरा चौकात कोश्यारींविरोधात शिवप्रेमी एकवटले

Solpaur : सोलापुरातील आसरा चौकात शेकडो शिवप्रेमी जमले असून कोश्यारींविरोधात घोषणाबाजी करण्यात येतेय. यावेळी भगवे झेंडे घेऊन राज्यपालांनी घेरण्यासाठी अनेक शिवप्रेमी एकवटल्याचं पाहायला मिळालंय.

| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Mar 04, 2022 | 10:52 AM
1 / 6
औरंगाबाद येथील वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. विवेकानंद केंद्राच्या वेदांतिक ॲप्लिकेशन ऑफ योग ॲन्ड मॅनेजमेंट प्रकल्पाचे लोकार्पण राज्यपालांच्या हस्ते होणार आहे.

औरंगाबाद येथील वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. विवेकानंद केंद्राच्या वेदांतिक ॲप्लिकेशन ऑफ योग ॲन्ड मॅनेजमेंट प्रकल्पाचे लोकार्पण राज्यपालांच्या हस्ते होणार आहे.

2 / 6

सकाळी राज्यपाल सोलापूर विमानतळावर पोहोचणार होते. मात्र त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोलापुरातील शिवप्रेमींनी तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवलाय.

3 / 6

सोलापुरातील आसरा चौकात शेकडो शिवप्रेमी जमले असून कोश्यारींविरोधात घोषणाबाजी करण्यात येतेय. यावेळी भगवे झेंडे घेऊन राज्यपालांनी घेरण्यासाठी अनेक शिवप्रेमी एकवटल्याचं पाहायला मिळालंय.

4 / 6

समर्थ नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांना कुणी विचारलं असतं, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकारण तापलं होत.

5 / 6

या परिस्थितीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही बंदोबस्त वाढवला आहे.

6 / 6

आता सोलापुरात वातावरण तापलं असून राज्यपालांना घेरण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शिवप्रेमींची एकजूट पाहायला मिळाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us