
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर वाशिममध्ये दगडफेक करण्यात आली आहे.

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप सोमय्यांनी केले होते, याची पाहणी करण्यासाठी ते निघाले होते.

सोमय्यांच्या ताफ्यावर शाईफेक करुन दगडफेक करण्यात आली. शिवसैनिकांनी ही दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे.

भावना गवळी यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा आरोप आहे

किरीट सोमय्या हे या ठिकाणी न थांबताच निघून गेले. पोलिसांना मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला