
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या ‘शिव-शक्ती परिक्रमा’ यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. फुलांची उधळण करत पंकजा मुंडे जंगी स्वागत करण्यात येत आहे.

रस्त्याच्या दुतर्फा थांबत कार्यकर्ते पंकजा मुंडे यांचं स्वागत करत आहेत. पंकजा मुंडे यांच्याशी संवाद साधण्यासाठी युवावर्ग रस्त्यावर थांबल्याचं पाहायला मिळत आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा पंकजा मुंडे यांना भेट म्हणून देण्यात आली. यावेळी करण्यात येणारं स्वागत पंकजा यांनी स्वीकारलं.

जेसीबीमधून फुलांची उधळण करत पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. यावेळी त्यांना भव्य हारही घालण्यात आला.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिकच्या प्रभू त्र्यंबकेश्वरांचं पंकजा मुंडे यांनी दर्शन घेतलं. विधिवत पूजा आणि अभिषेकही त्यांनी केला.