
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या शिवशक्ती परिक्रमा यात्रा आजपासून सुरु होत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळ घृष्णेश्वराचं दर्शन घेत पंकजा मुंडे यांनी या यात्रेची सुरुवात केली.

आजपासून सुरू झालेली पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा 11 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. 12 जिल्ह्यात पंकजा मुंडे पायी चालणार आहेत. 5 हजार किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे.

पंकजा मुंडे यांचं ठिकठिकाणी जंगी स्वागत केलं जातंय. मोठमोठे हार घालत आणि फुलांचा वर्षाव करत पंकजा मुंडे यांचं स्वागत केलं जातंय.

शिव-शक्ती परिक्रमेला सुरवात करण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पंकजा मुंडेंनी पुष्पहार अर्पण केला. तसंच अभिवादन केलं.

पंकजा मुंडे या आज औरंगाबाद, कोपरगाव, येवला, पंचवटी इथं जात देवदर्शन करणार आहेत. तसंच स्थानिकांशी संवाद साधणार आहेत.