
काँग्रेसने काही दिवसांआधी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा काढली. पदयात्रा करत त्यांनी लोकांशी संवाद साधला.

राहुल गांधी आता या भारत जोडो यात्रा दुसरा टप्पा करत आहेत. यात ते विविध ठिकाणी भेटी देत आहेत.

छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमधील कठियागावात राहुल गांधी यांनी भेट दिली. राहुल गांधी थेट शेतकऱ्याच्या शेतावर गेले.

यावेळी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांसोबत भात काढणी केली. राहुल गांधी यांचे हे फोटो सध्या चर्चेत आहेत.

राहुल गांधी यांनी यावेळी शेतकऱ्यांशी चर्चा केली. भात शेती करताना येणाऱ्या अडचणींवर शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसंच त्यावर काय उपाययोजना करता येतील, याचाही आढावा घेतला.

काँग्रेस सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी सकारात्मक असलेले निर्णय घेण्यात आले. त्यामुळे तेव्हा शेतकरी सुखी होता, असं म्हणत राहुल गांधी यांनी हे फोटो शेअर केलेत.