
भाजपचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी गृहमंत्री, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचा आज देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 'भारतरत्न' देशातील सर्वोच्च पुरस्काराने अडवाणी यांचा सन्मान करण्यात आला.

3 फेब्रुवारीला लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रपधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. आज अडवाणी यांना या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अडवाणी यांना हा पुरस्कार देण्यात आला. अडवाणी यांच्या घरी जात त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 10 लोक तिथे उपस्थित होते.

राष्ट्रपती भवनमध्ये शनिवारी इतर चार मान्यवरांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर आज अडवाणी यांच्या घरी जात त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. लालकृष्ण अडवाणी यांचा भाजप पक्षाच्या विस्तारात आणि देशाच्या जडणघडणीत मोठा वाटा राहिला. त्यांच्या या कार्याचा आज गौरव करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबतच जगदीप धनखड, राजनाथ सिंह, बीएल संतोष, व्यंकय्या नायडू हे यावेळी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांनी अडवाणी यांचं अभिनंदन केलं.