
मुबंईतील शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडत आहे. उद्धव ठाकरे आज संध्याकाळी संबोधित करतील. या सभेसाठी महाराष्ट्रभरातून लोक मुंबईत आले आहेत.

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात 12 हजार पोलीस बंदोबस्त तैनात आहे. आज मुंबईत दोन मेळावे पार पाडणार आहेत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जातेय.

उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकांनी व्हॅनिटी व्हॅनची तपासणी केली. सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांची कार सभेआधीच मैदानात दाखल आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिवाजी पार्क परिसरात आले आहेत. सकाळपासून शिवसैनिक जमायला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी हे शिवसैनिक आलेले आहेत.

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कातल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर फुलांची सजावट करण्यात आली आहे. शिवसैनिक त्यांना अभिवादन करत आहेत.