PHOTO | मी हाय कोली…! राज्यपाल कोळ्यांच्या वेशभूषेत; मासळी विक्रेता कोळी महिला संस्थेला भेट

मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्थेतर्फे मंगळवारी अक्षय तृतीयेनिमित्त मरोळ अंधेरी मुंबई येथे कोळी समाज सामाजिक सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल भगतलिंह कोश्यारी यांनी कोळी वेशभूषेत कार्यक्रमाला हजेरी लावली.

| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: May 03, 2022 | 7:49 PM
1 / 5
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्थेला भेट दिली. विशेष म्हणजे राज्यपालांनी कोळी वेशभूषेत कार्यक्रमाला भेट दिली होती.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्थेला भेट दिली. विशेष म्हणजे राज्यपालांनी कोळी वेशभूषेत कार्यक्रमाला भेट दिली होती.

2 / 5

मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्थेतर्फे मंगळवारी अक्षय तृतीयेनिमित्त मरोळ अंधेरी मुंबई येथे कोळी समाज सामाजिक सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

3 / 5

कोळी समाज हा भगवान विष्णूच्या दहा अवतारांपैकी एक असलेल्या पहिल्या मत्स्य अवताराचा वारसा सांगणारा समाज असून समाज बांधवांनी याचा सार्थ अभिमान बाळगावा असे राज्यपालांनी सांगितले.

4 / 5

यावेळी कोळी महिलांनी राज्यपालांना कोळी टोपी परिधान केली व सजवलेली होडी भेट दिली. संस्थेच्या सचिव प्रतिभा वैती पाध्ये यांनी आभार प्रदर्शन केले.

5 / 5

कोळी बांधवांच्या उपजीविकेच्या समस्या गंभीर आहेत. या समस्यांचा अभ्यास करून त्यांचे निराकरण करण्यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us