

राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि नव्याने शपथ घेतलेल्या राज्य कॅबिनेट मंत्र्यांसह, मुंबईतील राजभवन, रविवार, 2 जुलै 2023.

Ajit Pawar

त्यानंतर महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत मुंबईत रविवारी पत्रकार परिषद घेतली.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समर्थकांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य मंत्रिमंडळात सामील झालेल्या इतर पक्षाच्या नेत्यांचा निषेध म्हणून पोस्टरला काळं फासलं.

कार्यकर्त्यांनी मुंबईतील बॅलार्ड इस्टेटच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर रविवारी, 2 जुलै 2023 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बॅनर फाडलं. ते शिंदे-फडणवीस सरकारसोबत गेल्याचा कार्यकर्त्यांनी निषेध केला.

राष्ट्रवादीच्या कार्य़कर्त्यांनी रविवारी 2 जुलै 2023 रोजी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात अजित पवार आणि इतर नेते सामिल झाले, त्याविरोधात निदर्शनं केली.