AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी आयर्लंडला मिळाली संधी, झालं असं की…

आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी आणखी एका संघाला संधी मिळाली आहे. आता स्पर्धेसाठी फक्त एका संघाची आवश्यकता आहे. त्यासाठी इतर संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी आयर्लंडला मिळाली संधी, झालं असं की...
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी आयर्लंडला मिळाली संधी, झालं असं की...Image Credit source: Ireland Cricket Twitter
| Updated on: Feb 01, 2026 | 4:05 PM
Share

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेची तयारी जोरात सुरू आहे. मेन्स टी20 वर्ल्डकप संपल्यानंतर वुमन्स क्रिकेटचा थरार क्रीडाप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा 12 जून रोजी इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू होणार आहे. या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी होणार आहेत. यापैकी आता 11 संघ ठरले आहेत. या स्पर्धसाठी पात्रता फेरी सुरू आहे. पात्रता फेरीतून आणखी एका संघाची या स्पर्धेत वर्णी लागली आहे. आयर्लंडला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे. वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 साठी पात्र ठरणारा आयर्लंड तिसरा संघ ठरला. सुपर सिक्स टप्प्यात आयर्लंडला स्कॉटलंड आणि बांगलादेशकडून पराभव पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पण अमेरिका, नेदरलँड्स आणि थायलंडला पराभूत करत आयर्लंडने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत स्थान निश्चित केलं आहे. थायलंडला पराभूत करताच आयर्लंड टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं तिकीट मिळवणारा तिसरा संघ ठरला आहे.

आयर्लंडने थायलंडसमोर 122 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण थायलंडचा संघ फक्त 59 धावांतच गारद झाला. आयर्लंडची कर्णधार ग२बी लुईसने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. टॉप ऑर्डरला असलेल्या एमी हंटरने 24 तर गॅबी लुईसने 25 धावा केल्या. ऑर्ला प्रेंडरगॅस्टने 24 धावांची खेळी केली. यामुळे आयर्लंडच्या 10 षटकात 71 धावा होत्या. आयर्लंडने 20 षटकात 8 गडी गमवून 121 धावा केल्या आणि विजयासाठी 122 धावांचं आव्हान दिलं. थायलंडचा संघ 16.1 षटकं खेळू शकला आणि 59 धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला. आयर्लंडने हा सामना 62 धावांनी जिंकला.

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरले आहेत. नेदरलँड्स, बांगलादेश आणि आयर्लंडने पात्रता फेरीतून जागा मिळवली. आता शेवटच्या संघासाठी युएसए आणि स्कॉटलँड यांच्यात लढत होईर आहे. या संघातील विजेत्या संघाला टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे आता कोण बाजी मारणार? आणि कोणला तिकीट मिळते याची उत्सुकता आहे.

Follow Us
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर