Rohit Pawar Local Train Travel : भेटीगाठी, चर्चा अन् सेल्फी; आमदार रोहित पवार यांचा लोकल प्रवास
NCP MLA Rohit Pawar Travel By MUmbai Local Train : मुंबईमध्ये तुम्ही पाऊल ठेवलं की, तुम्हाला लोकलने प्रवास करावा लागतो. इतर कोणत्याही वाहनापेक्षा लोकलचा प्रवास अधिक सोयीस्कर ठरतो. राजकारणी मंडळी कधीतरीच हा लोकलप्रवास करताना दिसतात. आमदार रोहित पवार यांचा लोकल प्रवास...

मुंबई लोकल सर्वसामन्यांसाठी हक्काचं प्रवासाचं साधन आहे. इतर कोणत्याही वाहनाच्या तुलनेत तुम्ही जर लोकलने प्रवास केल्यास कमी वेळात इप्सित ठिकाणी पोहोचता. मुंबईमध्ये पाऊल पाऊल ठेवलं की लोकल प्रवास हा क्रमप्राप्त आहे.

राजकारणी मंडळी कधीतरीच लोकलने प्रवास करतात. राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी लोकलने प्रवास केला. त्यांचे या लोकल प्रवासाचे फोटो सोशल मीडियावर ट्रेंडिग आहेत.

आमदार रोहित पवार यांनी या लोकल प्रवासादरम्यान मुंबईकरांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कुर्ला ते कल्याण लोकल प्रवासाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

रोहित पवार यांच्यासोबत लोकलमधील प्रवाशांनी फोटो काढले. या प्रवासादरम्यान विविध भागातील नागरिकांच्या भेटी झाल्या आणि अनौपचारिक चर्चा करता आली, असं रोहित पवार म्हणालेत.

या प्रवासावेळी एका प्रवाशाने उपस्थित केलेला मुद्दा मला आवडला आणि पटलासुद्धा की, बुलेट ट्रेनवर खर्च करण्यापेक्षा आहे ती लोकलसेवा आणखी सक्षम केली तर त्याचा फायदा हा सर्वसामान्यांना नक्कीच होईल, त्यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.