
आज गणेश चतुर्थी आहे. घरोघरी बाप्पाचं आगमन होत आहे. त्यामुळे जल्लोषाचं वातावरण आहे. राजकारणी मंडळींच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे.

राज्याचे प्रथम नागरिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी श्रींची स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षआ निवासस्थानी वाजत गाजत गणरायाचं आगमन झालं. यावेळी संपूर्ण शिंदे कुटुंब उपस्थित होतं.

राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा दे, हेच मागणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती बाप्पा आज बाप्पाकडे मागितलं. तसंच सर्वसामान्य माणसाला सुखी ठेव, असं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरीही गणरायाचं आगमन झालं. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी बाप्पाची आरती केली. यावेळी सर्वांना सुखी ठेव, असं मागणं त्यांनी यावेळी मांडलं.

आधार तुझा, तू तारण करता, तू माता, तूच पिता...उपकार तुझे सुखदायक सुखकर्ता, गणपती बाप्पा मोरया!!!, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी हे फोटो शेअर केलेत. यावेळी फडणवीसांच्या घरची मंडळी आणि आप्तेष्ट उपस्थित होते.