
मुंबई | 19 मार्च 2024 : प्रशांत किशोर... भारतीय राजकारणाची जान असणारे रणनितीकार... भारतीय राजकारणात टिकून राहण्यासाठी, स्वत: ठस उमटवण्यासाठी काय करता येईल? निवडणुका जिंकण्यासाठी कोणती पावलं उचलावीत? यासाठी प्रशांत किशोर यांनी राजकीय पक्षांसोबत त्यांनी काम केलं आहे.

प्रशांत किशोर 'जन सुराज' ही नवी संघटना सुरु केली आहे. त्यामाध्यमातून त्यांनी बिहारमध्ये एक पदयात्रा काढली. लोकांशी संवाद साधला. राजकीय परिस्थितीबाबत लोकांनी जागरूक झालं पाहिजे, असं मत प्रशांत किशोर यांनी मांडलं.

तुमच्या जीवनावर सिनेमा आला तर तुमची भूमिका कुणी करावं, असं तुम्हाला वाटतं? असा सवाल त्यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी पंकज त्रिपाठी यांचं नाव घेतलं. पंकज त्रिपाठी यांनी माझी भूमिका करावी, असं प्रशांत किशोर म्हणाले.

प्रशांत किशोर यांनी आणखी एका अभिनेत्याचं नाव घेतलं. अभिनेते पंकज त्रिपाठी किंवा अभिनेते मनोज बाजपेयी यांनी माझी भूमिका केली तर मला आवडेल. दोघेही बिहारचे आहेत. या दोघांपैकी कुणीही माझी भूमिका केली तरी मला आनंदच होईल.

प्रशांत किशोर सध्या लोकांमध्ये जात आहेत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. तसंच राजकीय दृष्ट्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी आपण लोकांमध्ये जात असल्याचं प्रशांत किशोर सांगतात.