
मागच्या काहीपासून उसंत घेतलेल्या पावसाने दोन दिवसांपासून राज्यात दमदार हजेरी लावली आहे. अशात विदर्भातही मुसळधार पाऊस पडतोय.

नागपूरमध्ये ठिकठिकाणी धो-धो पाऊस कोसळला. त्यामुळे नागपूरच्या अनेक भागात पाणी साचलं आहे. अनेक नागरिकांच्या घरात पाणी साचलं आहे.

नागपूरमध्ये कोसळणाऱ्या पावसामुळे नाग आणि पिवळी नदीला पूर आलाय. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झालाय.

नागपूर शहरातील सखल भागात पाणी साचलंय. नागपुरात 400 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे.

नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. अनेकांच्या घरातील वस्तूचं नुकसान झालंय. तसंच घरासमोरच्या गाड्याही पाण्याखाली गेल्या आहेत.