Amit Thackeray | नवी मुंबईत मनसेच्या 3 नव्या शाखा, उद्घाटनासाठी अमित ठाकरेंची हजेरी!

Amit Thackeray in Navi Mumbai : नवी मुंबई मनसेच्या "शिवजनसंपर्क अभियानाचे" औचित्य साधून अमित ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या नेरूळ, जुईनगर व घणसोली विभागातील तीन शाखांचा उद्घाटन सोहळा पार पडला.

| Edited By: | Updated on: Feb 20, 2022 | 7:11 PM
1 / 8
नवी मुंबई मनसेच्या "शिवजनसंपर्क अभियानाचे" औचित्य साधून अमित ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या नेरूळ, जुईनगर व घणसोली विभागातील तीन शाखांचा उद्घाटन सोहळा पार पडला.

2 / 8
नेरूळ येथील मनसे विभाग अध्यक्ष उमेश गायकवाड यांच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी 25 झाडांचे वृक्षरोपण करून या सर्व वृक्षांना मनसेच्या शाखेने दत्तक घेतलंय. यावेळी अमित ठाकरे यांनी स्वतः वृक्षरोपण केलं, तसंच अभिनव उपक्रमाचे कौतुक वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.

3 / 8
अमित ठाकरेंच्या हस्ते यावेळी  रेशन कीटचं वाटप करण्यात आलं.

4 / 8
यावेळी वृक्षरोपणासह त्या वृक्षांना दत्तक घेणे, वाचनालयाला पुस्तके भेट देणे व महिला सफाई कामगारांना रेशन कीट देणे असे निरनिराळे उपक्रम राबविण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. जोरदार घोषणा देत मनसैनिकांनी परिसर दणाणून सोडला होता.

5 / 8
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवापासून नवी मुंबई 2 मार्चपर्यंत "शिवजनसंपर्क अभियान" मनसेमार्फत राबवलं जाणार आहे.

6 / 8
मनसेकडून शिवजनसंपर्क अभियाना अंतर्गत नवी मुंबईकरांशी थेट भेटून संवाद साधणार आहे. या संवादातून नवी मुंबईकरांच्या शहर विकासाबाबत विचार, सूचना आणि दृष्टिकोन जाणून घेणार असल्याचे मनसेने म्हटलंय.

7 / 8
यावेळी आशिया खंडातील सर्वात छोटी गिर्यारोहक श्रविका म्हात्रे हिला देखील सन्मानित करण्यात आले. जुईनगर येथील मनसे विभाग अध्यक्ष अक्षय भोसले यांच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी नवी मुंबईतील कुसुमाग्रज वाचनालयाला पुस्तकांचा संच मा.अमितसाहेब ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला.

8 / 8
तर घणसोली येथील मनसेच्या रस्ते आस्थापना आणि साधन सुविधा विभागाचे शहर संघटक संदीप गलुगडे यांच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी विभागातील महिला सफाई कामगार यांना एक महिन्याचे रेशन कीट अमित ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आले.