
राजधानी दिल्लीतील किर्तीनगर हे आशिया खंडातील सर्वात मोठ्या फर्निचर मार्केट आहे. या मार्केटला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेट दिली.

किर्तीनगरमधील कारागिरांसोबत राहुल गांधी यांनी फर्निरचं कामही केलं. हाती हातोडा घेत त्यांनी या कारागिरांना त्यांच्या कामात मदत केली.

हातात करवत घेत राहुल गांधी यांनी फर्निचरचं काम करण्याचा प्रयत्न केला. कारागिरांच्यासोबत स्टडीटेबल बनवला.

यावेळी तिथल्या कामगारांसोबत त्यांनी चर्चा केली. फर्निचरचं हे काम करत असताना कोणत्या अडचणी येतात, यावर राहुल गांधी यांनी संवाद साधला.

राहुल गांधी हे स्वत: किर्तीनगरमधल्या बाजारात आल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. या कर्मचाऱ्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत फोटो काढला.