AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ॲल्युमिनियम फॉईलमध्ये चपाती बांधताय?, डॉक्टरांनी केले सावध, पाहा काय म्हणाले

आजकल ॲल्युमिनियम फॉईल वापर चपात्यांना ठेवण्यासाठी सर्रासपणे केला जात असतो. खासकर करुन जेवणाचा डबा भरताना या फॉईलमध्ये चपात्या लपेटून दिल्या जातात. परंतू डॉक्टरांनी या संदर्भात सावधान केले आहे.

ॲल्युमिनियम फॉईलमध्ये चपाती बांधताय?, डॉक्टरांनी केले सावध, पाहा काय म्हणाले
aluminum foil
| Updated on: Dec 16, 2025 | 10:50 PM
Share

Health Tips: आजकाल अनेक जण सहज मिळत असलेल्या ॲल्युमिनियम फॉईलचा चपाती गुंडाळण्यासाठी वापर करत असतात. ऑफिसला जाताना लंच बॉक्समध्ये चपाती ओली होऊ नये म्हणूनही फॉईल वापरली जात असते. परंतू ही सवय आरोग्यासाठी घातक होऊ शकते असे म्हटले जात आहे. डॉ. तरंग कृष्णा यांच्या मते ॲल्युमिनियम फॉइलमध्ये गरमागरम भरलेल्या चपात्या किंवा बराच काळ ठेवलेल्या चपात्यातून आपल्या शरीरात ॲल्युमिनियम जमा होऊ शकते. त्यामुळे हळूहळू कॅन्सरसारख्या आजारांना हे निमंत्रण ठरु शकते. त्यामुळे चपात्यांना फॉईलमध्ये गुंडाळण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

डॉक्टर तरंग कृष्णा यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या एका पॉडकास्टमध्ये पोस्ट केले आहे. त्यात त्यांनी सांगितले की फॉईलमध्ये चपाती गुंडाळू नये. ॲल्युमिनियम फॉईलमध्ये चपात्या गुंडाळल्याने याचे ॲल्युमिनियमचे कण शरीरात जात असतात. ज्यामुळे आपला इम्युन सिस्टीम डॅमेज होऊ शकते. हळूहळू त्यामुळे एक पाऊल कॅन्सरकडे जाऊ शकते.

ॲल्युमिनियम फॉईलचा वापर नको

डॉक्टर तरंग कृष्णा यांनी सांगितले की जर तुम्हाला तुमच्या जेवणास किंवा चपाती आणि भाकरी यांना गुंडाळून ठेवायचे असेल तर ॲल्युमिनियम फॉईलचा वापर करण्याऐवजी इतर रॅपिंग पेपरचा वापर करावा.

WHO च्या संशोधनातून उघड

डॉक्टर तरंग कृष्णा सांगतात की जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) सांगितले की आहे जर तुम्ही ॲल्युमिनियम भांड्यात जेवण शिजवत असाल तर त्यास एक वर्षांनंतर बदला. जर तुम्ही असे केले नाही तर तुमच्या आरोग्यासाठी ते धोकादायक सिद्ध होऊ शकते आणि कॅन्सर सारख्या आजाराचा धोका वाढू शकतो.

( डिस्क्लेमर – ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. टीव्ही 9 मराठी या बातमीला दुजोरा देत नाही.)

Follow Us
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर