
लोकमान्य टिळक पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं. आज ते पुण्यात आहेत. त्यांच्या स्वागतासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती.

मोदी यांचा ताफा जात असताना त्यांची एक झलक पाहण्यासाठी पुणेकर रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळालं.

हातात मोबईल घेत पंतप्रधानांची एक झलक टिपण्यासाठी पुणेकर प्रयत्न करताना दिसले

बाल्कनीमध्ये उभं राहात महिलावर्गाने मोदींना अभिवादन केलं.

रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांच्या पायऱ्यांवर पंतप्रधान मोदी यांना पाहण्यासाठी ही अशी गर्दी झाली होती.