
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहेत. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी लोकांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या झारखंडमध्ये आहे. यावेळी राहुल गांधी यांनी झारखंडच्या गोधरा भागातील 'काली बस्ती' या ठिकाणी भेट दिली.

ना सुरक्षित वर्तमान, ना चांगलं भविष्य... म्हणत राहुल गांधी यांनी एक पोस्ट शेअर केली. राहुल गांधी यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यांच्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा होतेय.

गोधरा भागातल्या 'काली बस्ती'मध्ये मी जे पाहिलं. ते अत्यंत भयानक वास्तव होतं. ते तुम्हीही पाहायला हवं, असं राहुल गांधी म्हणाले.

झारखंड गोधरातल्या 'काली बस्ती' या भागातील हा फोटो... लहान मुलं अन् त्यांच्या भोवतीचा परिसर भारताच्या ग्रामिण भागाचं वास्तव सांगणारा आहे.