
राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे सध्या युवकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरले आहेत. युवा संघर्ष यात्रा ते करत आहेत.

रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सध्या तुळापूरमध्ये आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जात ते तरूणाईसह त्यांनी अभिवादन केलं. त्यानंतर त्यांच्या आजच्या दिवसाची सुरुवात झाली.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरूणांनी रोहित पवार यांची भेट घेतली. या भेटीत पोलीस भरतीतील अडचणींवर चर्चा झाली.

झेंडूच्या फुलांना भाव नसल्याने ही फुलं रस्त्यावर टाकण्यात आली आहेत. याबाबत रोहित पवार यांनी स्थानिकांशी संवाद साधला.

फुलगावमधील नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूलला रोहित पवार यांनी भेट दिली. यावेळी एका चिमुकल्याने त्यांना हे चित्र भेट दिलं.