वयाच्या 18व्या वर्षी अभिनेत्रीने केली मोठी चूक, लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री पतीचे सत्य कळताच…

वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी अभिनेत्रीने पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आज ती याविषयी बोलताना म्हणते, "तीच माझी सर्वात मोठी चूक!"

| Updated on: Jul 29, 2025 | 1:43 PM
1 / 5
टेलिव्हिजन विश्वात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री पूजा बॅनर्जीने तिच्या आयुष्यातील एका खासगी आणि वेदनादायी अनुभवाचा खुलासा केला आहे. सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत तिने उघड केलं की, वयाच्या १८व्या वर्षी तिने घर सोडून पळून जाऊन लग्न केलं होतं. मात्र, आज ती त्या निर्णयाला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक मानते.

2 / 5
पूजाने आपल्या पहिल्या लग्नाबाबत मोकळेपणाने सांगितलं, "मी जेव्हा १८ वर्षांची होते, तेव्हा मी घरातून पळून जाऊन लग्न केलं. पण एका रात्री मला समजलं की, ज्याच्यासाठी मी माझ्या कुटुंबाला सोडलं, तो व्यक्ती तसा नाही. लग्नानंतर त्याचं वागणं पूर्णपणे बदललं." या धक्कादायक अनुभवाने ती हादरली, तरीही ती लगेच घरी परतली नाही. तिला वाटलं की, तिने आपल्या आई-वडिलांना दुखावलं आहे.

3 / 5
पूजाने सांगितलं की, तिच्या पहिल्या पतीसोबतचं नातं हळूहळू विखुरत गेलं. "मी जेव्हा कुणालला भेटले, तेव्हा माझ्या आणि माझ्या पहिल्या पतीमध्ये फक्त औपचारिक नातं उरलं होतं. आम्ही कधीच एकमेकांसाठी योग्य नव्हतो. ते लग्न फक्त तीन वर्षं टिकलं, आणि मग आम्ही वेगळे झालो," असं ती म्हणाली.

4 / 5
पूजाने आणखी एक खळबळजनक खुलासा केला की, तिचा पहिला पती लग्नादरम्यान दुसऱ्या कोणाला तरी डेट करत होता. "मी घरी यायचे तेव्हा तो माझ्याकडे नीट पाहायचाही नाही," असं तिने सांगितलं. या सगळ्या घटनांनंतरही तिच्या पहिल्या पतीने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत त्यांच्यातील सगळं संपलं होतं, असं पूजा म्हणाली.

5 / 5
२०२० मध्ये पूजा बॅनर्जीने अभिनेता कुणाल वर्मा याच्याशी लग्न केलं. या लग्नाआधीच त्यांना एक मुलगा झाला होता. एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्य कसं बदलू शकतं आणि त्यातून बाहेर पडून नव्याने कसं सुरू करता येतं, याचं उदाहरण पूजाने घालून दिलं आहे. तिचा हा अनुभव आणि तिची धैर्याची कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे.