विजय मल्ल्याने दिली ओळख, एका कॅलेंडरने बदलले नशीब पण बॉलिवूडमध्ये..
विजय मल्ल्या यांच्या कॅलेंडरमधून एका अभिनेत्रीला मोठी ओळख मिळाली. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून पूनम पांडे आहे. या कॅलेंडरनंतर आपल्याला एक वेगळी ओळख मिळेल, असे तिला वाटत होते. पण प्रत्यक्षात वेगळे घडले.

पूनम पांडे आणि वाद हे समीकरण बघायला मिळते. आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने भाष्य करताना अनेकदा पूनम पांडे दिसते. शुभोजित घोष यांच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला किंगफिशरचे कॅलेंडर शूट करण्याची मोठी संधी मिळाली होती, असे तिने म्हटले.
यानंतर मला वाटते होते की, माझे करिअर बदलेल आणि बॉलिवूडच्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळेल. पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. नवीन लोकांना बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख तयार करणे अवघड आहे.
बॉलिवूडमध्ये मोठ्या नावांचा दबाव आहे. पूजन पांडे हिने हे देखील मान्य केले की, प्रसिद्धीत राहण्यासाठी तिला कंट्रोवर्सी करावी लागते. चांगले काम करून फक्त लोक तुम्हाला ओळखत नाहीत.
ओळख मिळवण्यासाठी आणि चांगले काम मिळवण्यासाठी पूनम पांडे हिने कंट्रोवर्सी आणि बोल्ड सीन्सचा वापर केला. पण हे करूनही तिचा फार काही खास फायदा झालाच नाही.
पूनम पांडे ही 2011 च्या वर्ल्डकपनंतर चर्चेत आली. तिने एक धक्कादायक विधान केले. ज्यानंतर तिच्यावर टीकाही झाली आणि तिच्या नावाची जोरदार चर्चाही रंगताना दिसली.