Retirement Plan Policy : रिटायरमेंटची प्लानिंग करताय? कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट योजना, अवघ्या 5 वर्षात 450000 रुपये मिळेल व्याज
रिटायरमेंटची प्लानिंग करत असाल,तर तुमच्यासाठी एक बेस्ट योजना आहे. तुम्हाला अवघ्या 5 वर्षात फक्त व्याजच 450000 रुपये मिळतील. योजनेचे गणित समजून घ्या.

पोस्ट ऑफिसकडून प्रत्येक वयोगटाच्या वर्गासाठी योजना काढली जाते. सरकार बचतीच्या योजनांवर चांगलं व्याज मिळतं. या योजनेअंतर्गत गुंतवणुकीसह सुरक्षेची देखील हमी मिळते. तुम्हाला गुंतवणुकीबाबत जोखीम नको असेल, तर तुमच्यासाठी ही योजना चांगली आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट असं या योजनेचं नाव आहे.
NSC पोस्ट ऑफिसच्या या बचत योजना कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. मध्यमवर्गीय आणि निवृत्तीची योजना आखणाऱ्यांमध्ये लोकप्रिय योजना आहे. तुम्ही 5 वर्षांच्या कालावधीत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करू शकता. यात गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.
तुम्ही या योजनेत जितकी जास्त गुंतवणूक कराल, तितका तुम्हाला परतावा मिळेल. ही योजना सुरक्षित योजना आहे. त्यामुळेच ही योजना लोकप्रिय ठरत आहे. स्वत: सरकार हमी देते. सरकार या योजनेवर 7.7 टक्के व्याज देते. या योजनेचा लाभ फक्त भारतीय रहिवासीच घेऊ शकतो.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) या योजनेवर 7.7 टक्के व्याज मिळते. या योजनेत एखाद्या नागरिकाने 10 लाख गुंतवले, तर त्यांना 5 वर्षांत व्याजाचे 4,49,034 रुपये मिळतील. एकंदरित तुम्हाला पाच वर्षांत एकूण 14,49,034 रुपये मिळतील.
या योजनेत पहिल्या वर्षी 77000 रुपये, दुसऱ्या वर्षी 1,59,929 रुपये, तिसऱ्या वर्षी 2,49,044 रुपये, चौथ्या वर्षी 3,45,620 रुपये मिळतील. तर पाचव्या वर्षी 4,49,034 रुपये व्याज मिळेल.