7000mAh तगडी बॅटरी-50MP चा कॅमरा, किंमत इतकी कमी, Karbonn Rebel लाँच
Karbonn Rebel: 12 हजाराहून कमी किंमतीत जर तुम्हाला फोन खरेदी करायचा असेल तर या किंमतीत कार्बनचा नवा फोन लाँच झाला आहे. या फोनमध्ये काय-काय सुविधा आहेत. आणि फोनची विक्री कोणत्या दिवशी सुरु होईल हे पाहूयात...

Karbonn Rebel Launched: कार्बनने कमी बजेट असलेल्या ग्राहकांसाठी एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा हँडसेट तीन रंगात मिळतो. या फोनला 7000 एमएएचची दमदार बॅटरी दिलेली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार फोनला दोन वर्षांची सिक्युरिटी आणि दोन वर्षांचा ओएस अपग्रेड मिळणार आहेत.
Karbonn Rebel Price in India: कार्बन रिबेलची किंमत 14 हजार 999 रुपये आहे. परंतू हा फोन तुम्हाला 11999 रुपयात लाँच प्राईजमध्ये मिळणार आहे. फोन 1000 रुपयांच्या बँक कार्ड डिस्काऊंटनंतर 10,999 रुपयात मिळेल. फोनची विक्री 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरु होईल. हा फोन गोल्ड, ब्ल्यू आणि सिल्व्हर रंगात मिळले.
बॅटरी: 7000 एमएएचची दमदार बॅटरी फोनला देण्यात आली आहे, जी 18 वॅट फास्ट चार्ज सपोर्ट करते. कनेक्टिव्हीटीसाठी यात ब्ल्यूटुथ व्हर्जन, ड्युअल बँड वायफाय, टाईप सी पोर्ट आणि 3.5 मिलीमीटर ऑडिओ जॅकचा समावेश आहे.
कॅमरा: रिअरमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमरा सेंसर दिला आहे आणि फ्रंटमध्ये 16 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा सेंसर दिला आहे. हा बजेट फोन सिंगल रिअर कॅमेरा सेंसर सह उतरवण्यात आला आहे.
Karbonn Rebel Specifications: ड्युअल सिमवाला हा फोन 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 6.75 इंचाच्या एचडी प्लस रिझॉल्यूशन डिस्प्लेसह येतो. हा फोन 650 निट्सच्या पिक ब्राईटनेस सह येतो. या हँडसेटमध्ये स्पीड आणि मल्टीटास्कींगसाठी 2.0 गीगाहर्ट्झचा मिडिया टेक हिलिओ जी 81 ऑक्टा कोर प्रोसेसर दिला आहे. सिक्युरिटीसाठी या फोनमध्ये फेस अनलॉक आणि साईड माऊंट फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.