Prajakta Mali: नवं घर घेतलं अन् महिनाभरात जुना फ्लॅट विकला; प्राजक्ता माळीच्या प्रॉपर्टी डीलमागचं कारण काय?

Prajakta Mali: प्राजक्ता माळीने 10 सप्टेंबरला तिचा 473 चौरस फूट जुना फ्लॅट 1.12 कोटी रुपयांना विकल्याचा व्यवहार नोंदवला गेला. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच तिने नवीन घर विकत घेतलं होतं.

| Updated on: Sep 20, 2026 | 11:25 AM
1 / 6
Prajakta Mali: मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या अभिनयामुळे नव्हे, तर कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टी व्यवहारामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे, तिने ऑगस्टमध्ये 6.42 कोटी रुपयांचं नवं घर खरेदी केल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांत गोरेगाव पूर्वेतील 473 चौरस फुटांचा जुना फ्लॅट 1.12 कोटी रुपयांना विकल्याची माहिती समोर आली आहे.

Prajakta Mali: मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या अभिनयामुळे नव्हे, तर कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टी व्यवहारामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे, तिने ऑगस्टमध्ये 6.42 कोटी रुपयांचं नवं घर खरेदी केल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांत गोरेगाव पूर्वेतील 473 चौरस फुटांचा जुना फ्लॅट 1.12 कोटी रुपयांना विकल्याची माहिती समोर आली आहे.

2 / 6

मात्र, हा जुना फ्लॅट नेमका का विकला, याचं अधिकृत कारण प्राजक्ताने अद्याप सांगितलेलं नाही. प्रॉपर्टी नोंदीनुसार, प्राजक्ताने 12 ऑगस्ट 2026 रोजी गोरेगाव पूर्व इथल्या 'ओबेरॉय एक्स्विसिट' या प्रकल्पात सुमारे 996 चौरस फूट कार्पेट एरिया असलेलं घर खरेदी केलं.

3 / 6

या व्यवहाराची किंमत 6.42 कोटी रुपये असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. या खरेदीसाठी प्राजक्ताने भारतीय बँकेकडून तब्बल 5.78 कोटी रुपयांचं होम लोन घेतल्याची माहिती आहे. यानंतर 10 सप्टेंबर 2026 रोजी तिच्या 473 चौरस फुटांच्या जुन्या फ्लॅटच्या विक्रीचा व्यवहार नोंदवण्यात आला.

4 / 6

हा फ्लॅट 1.12 कोटी रुपयांना विकल्याचं कागदपत्रांवरून समोर आलं असून, व्यवहारासाठी 6.73 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरल्याची माहिती आहे. दोन्ही व्यवहारांमधील केवळ 29 दिवसांचं अंतर पाहता, तिच्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओमध्ये काही बदल झाल्याची शक्यता चर्चेत येत आहे.

5 / 6

रिअल इस्टेट अॅनालिटिक्स फर्म 'सीआरई मॅट्रिक्स'चे सीईओ अभिषेक किरण गुप्ता यांनी 'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना अशा व्यवहाराकडे ‘पोर्टफोलियो रिबॅलेन्सिंग’ किंवा दुसऱ्या मालमत्तेत भांडवल वळवण्याचा निर्णय म्हणून पाहता येऊ शकतं, असं सांगितलं आहे.

6 / 6

या संपूर्ण व्यवहारातील आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे घराच्या आकारातील फरक. विकलेला फ्लॅट 473 चौरस फुटांचा होता, तर नवीन घर जवळपास 996 चौरस फुटांचं आहे. नव्या घराची नोंदणीकृत किंमत पाहता प्रति चौरस फूट किंमत अंदाजे 64,500 रुपये येते. त्यामुळे हा व्यवहार केवळ राहण्यासाठी घर बदलण्याचा निर्णय आहे की प्राजक्ताच्या मालमत्ता पोर्टफोलिओमधील नियोजनबद्ध बदल, हे मात्र तिच्या अधिकृत प्रतिक्रियेनंतरच स्पष्ट होऊ शकतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us