प्राजक्ता माळीचं फरसाण खाण्यावरून ट्रोलिंग; टीकाकारांना स्पष्ट म्हणाली “जे लोक जास्त मैदा..”

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या फरसाण खाण्यावरून अनेकदा मीम्स व्हायरल होतात. त्यावर आता तिने प्रतिक्रिया दिली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात प्राजक्ताला फरसाण खाताना पाहिल्यानंतर त्यावरून ट्रोलिंगची सुरुवात झाली होती.

| Updated on: Jul 14, 2025 | 12:37 PM
1 / 5
अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या सौंदर्यामुळे आणि दमदार अभिनयकौशल्यामुळे सतत चाहत्यांमध्ये चर्चेत असते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमुळे तिला अधिक लोकप्रियता मिळाली. प्राजक्ताला फरसाण खाण्यावरून अनेकदा ट्रोल केलं जातं. त्यासंदर्भात तिचे बरेच मीम्ससुद्धा व्हायरल झाले आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने फरसाण खाण्यावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे.

2 / 5
आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल प्राजक्ता म्हणाली, "उत्तम आहार आणि उत्तम दिनचर्या या दोन गोष्टींचं मी काटेकोर पालन करते. तुम्ही जे खाता, जसं खाता, तसं तुम्ही बनता, असं मला वाटतं. त्यामुळे काय खायचं, याची निवड विचारपूर्वक करणं गरजेचं आहे."

3 / 5
"जर तुमच्या आहारात भरपूर मैदा असेल, तर तुम्ही मैद्यासारखे (लठ्ठपणाचा हावभाव करते) होणार. मी फरसाण खाते. आज दुपारच्या जेवणात मटकीची भाजी होती. त्यामुळे नुसती भाजी आणि पोळी कसं खाणार म्हणून त्याच्यासोबत मी फरसाण घेतलं होतं. कधीकधी दोडक्याची भाजी असते, तर त्यावरही मी फरसाण टाकून खाते", असं प्राजक्ताने सांगितलं.

4 / 5
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात अनेकदा प्राजक्ताच्या फरसाण खाण्यावरून ट्रोल करण्यात आलं. त्यावर प्रतिक्रिया देताना ती म्हणाली, "मी फरसाण खाते, पण जेव्हा हास्यजत्रेमुळे मी फरसाण खात असल्याचं ग्लॉरिफाय केलं गेलं, तेवढं मी खात नाही. त्याचं प्रमाण खूप कमी असतं."

5 / 5
प्राजक्ताच्या फरसाण खाण्यावरून भन्नाट मीम्ससुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर तिच्या फोटोंच्या कमेंटमध्ये अनेकदा नेटकरी फरसाणचा उल्लेख करून तिची मस्करी करतात.