
अहमदाबाद येथील प्रसिद्ध साबरमती रिव्हरफ्रंट इव्हेंट सेंटरवर 'प्रमुख वरणी अमृत महोत्सवा'चा मुख्य सोहळा अत्यंत भव्यतेने संपन्न झाला. प्रमुखस्वामी महाराजांच्या निष्काम आणि मानवकल्याणकारी सेवांना विविध रचनात्मक सादरीकरणांद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बी.ए.पी.एस. चे अध्यक्ष पूज्य महंत स्वामी महाराज, केंद्रीय गृहमंत्री श्री अमितभाई शाह, गुजरातचे मुख्यमंत्री श्री भूपेन्द्रभाई पटेल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

साबरमती नदीकाठी आयोजित या प्रभावी सभेत 75 वर्षांपूर्वी - 1950 साली बी.ए.पी.एस. चे संस्थापक ब्रह्मस्वरूप शास्त्रीजी महाराज यांनी अहमदाबादच्या आंबलीवाली पोल येथे प्रमुखस्वामी महाराजांचे आजीवन अध्यक्ष म्हणून झालेले नियुक्ती-स्मरण उत्साहात साजरे करण्यात आलं. पूज्य प्रमुखस्वामी महाराजांच्या अथक सेवाभाव, विनम्रता, करुणा आणि सर्वहितासाठी समर्पित जीवनाला भावपूर्ण वंदन अर्पित करण्यात आलं.

मंचाची कलात्मक सजावटीतून प्रमुखस्वामी महाराजांच्या ऐतिहासिक प्रवासाचे सुंदर प्रतिबिंब होती—एका बाजूस आंबलीवाली पोलचा पवित्र ऐतिहासिक प्रसंग आणि दुसऱ्या बाजूस दिल्ली अक्षरधामचे भव्य रूप. एका साधूच्या तपश्चर्येतून जागतिक अध्यात्मिक चळवळीच्या उदयाची कथा या संपूर्ण मंचातून जाणवत होती.

संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी वाजता माननीय केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह, माननीय मुख्यमंत्री श्री भूपेन्द्रभाई पटेल आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री हर्षभाई संघवी यांचे महोत्सवस्थळी आगमन झालं. बी.ए.पी.एस.च्या वरिष्ठ संतांनी त्यांचे स्वागत केले. ‘प्रमुख वरणी अमृत महोत्सव’च्या परिचयात्मक व्हिडिओने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर युवा मंडळाने विषयानुसार नृत्यरचना सादर केली. प्रमुखस्वामी महाराजांच्या जीवनगुणांवर आधारित प्रस्तुतीकरण करण्यात आलं. त्यामध्ये निष्काम सेवा, अहं- शून्यता, श्रद्धा – दृढ विश्वास, निष्ठा यांवर आधारित प्रसंग होते.

माननीय केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह यांनी प्रमुखस्वामी महाराजांशी संबंधित त्यांच्या अनुभवांचे स्मरण करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तसेच पूज्य महंत स्वामी महाराजांच्या प्रेरणेने चालणाऱ्या बी.ए.पी.एस.च्या आध्यात्मिक व सामाजिक सेवांची प्रशंसा केली. “ प्रमुखस्वामी महाराजांनी भक्ती आणि सेवा—हे दोनही मूल्ये अद्वितीय रीतीने एका सूत्रात बांधले. त्यांनी आपल्या सनातन धर्माच्या संत-परंपरेला पुनर्जीवित केले. सनातन धर्म आणि समाजावर आलेल्या कठीण काळात प्रमुखस्वामी महाराज मार्गदर्शक ठरले. त्यांचे कार्य देशातील सर्वच संप्रदायांसाठी अनुकरणीय आहे.” असे ते म्हणाले.

सुमारे 50 हजार भक्त, महंत स्वामी महाराज आणि सर्व मान्यवरांनी केलेली सामूहिक आरती अत्यंत भावविभोर करणारी ठरली. यानंतर बाल–किशोर–युवा वर्गाने नृत्यांजली सादर केली. साबरमतीच्या आकाशात चमकणाऱ्या भव्य आतिषबाजीत ‘प्रमुख वरणी अमृत महोत्सव की जय’च्या घोषात हा ऐतिहासिक उत्सव संपन्न झाला.

पूज्य महंत स्वामी महाराजांच्या प्रेरणेने तीन महिन्यांपासून या महोत्सवाची तयारी करण्यात आली. २० सेवा विभागांचे ७००० हून अधिक स्वयंसेवक अखंड सेवेतील होते. अहमदाबाद शहरभरातून ५०,००० भक्त व्यवस्थित बसव्यवस्थेद्वारे स्थलावर पोहोचले, ज्यामुळे वाहतूक सुरळीत राहिली. अहमदाबाद महानगरपालिकेने सुरक्षा, वाहतूक आणि व्यवस्थापनासाठी पूर्ण सहयोग दिला.