निळ्या साडीत प्रार्थनाचा दिलखेच अंदाज, मराठमोळ्या लुकमधील सौंदर्य पाहून चाहते फिदा
गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी प्रार्थना बेहेरेचा पारंपरिक लूक. निळ्या साडीमधील सौंदर्य आणि हटके पोजने वेधलं सर्व चाहत्यांचं लक्ष.

गणेशोत्सवाच्या उत्साहात अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने लाडक्या बाप्पाला भक्तिभावाने निरोप दिला. गणेशमूर्ती विसर्जनाच्या या खास प्रसंगी तिचा पारंपरिक आणि आकर्षक साडीतील लूक पाहायला मिळाला.
तिच्या या सुंदर अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रार्थना बेहेरेने यावेळी गडद निळ्या रंगाची पारदर्शक चंदेरी पारंपरिक साडी परिधान केली होती.
या साडीवरील हिरवा-सोनेरी काठ तिच्या लूकला अधिक खुलवत होता. साडीसोबत तिने मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला असून, पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचा सुंदर मेळ साधला आहे.
तिच्या लूकला मोठ्या पारंपरिक झुमक्यांची खास जोड मिळाली. मोकळे केस, हलका मेकअप, कपाळावर नाजूक टिकली आणि गडद रंगाची लिपस्टिक यामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.
प्रार्थनाने तिचे हे साडीमधील खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, चाहत्यांकडून तिच्या मराठमोळ्या रूपाचे कौतुक केले जात आहे.