नजर थांबली, मन हरवलं… बाकी काय सांगू? प्रार्थना बेहेरेच्या नवीन लुकवर चाहते फिदा, सौंदर्य पाहून…

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने शेअर केला पारंपरिक पैठणीतील खास लुक. सौंदर्य आणि दागिन्यांनी वेधलं सर्वांचं लक्ष. फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव.

| Updated on: Sep 17, 2026 | 3:55 PM
1 / 5
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिच्या घरी यंदा लाडक्या गणरायाचे थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले आहे.

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिच्या घरी यंदा लाडक्या गणरायाचे थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले आहे.

2 / 5

गणेशोत्सवाचा आनंद साजरा करताना प्रार्थनाने सोशल मीडियावर बाप्पाच्या स्वागताचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

3 / 5

या फोटोंमध्ये तिचा पारंपरिक आणि देखणा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रार्थना बेहेरेने गडद रंगाची पारंपरिक पैठणी साडी नेसली आहे.

4 / 5

सोनेरी जरीच्या काठामुळे तिची साडी अधिकच खुलून दिसत असून, या साडीवर तिने सुंदर डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.

5 / 5

प्रार्थनाने आपल्या या खास लूकसाठी पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांची निवड केली आहे. गळ्यात दोन-तीन पदरी लांब सोन्याचे हार, नाजूक मंगळसूत्र आणि कानात आकर्षक झुमके परिधान केले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us