Preity Zinta: प्रिती झिंटा करणार राजकारणात प्रवेश? स्वत: अभिनेत्रीने दिले उत्तर
Preity Zinta: गेल्या काही दिवसांपासून इंडस्ट्रीपासून लांब असलेली अभिनेत्री प्रिती झिंटा आता राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर स्वत: अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिती झिंटा ही कायमच चर्चेत असते. ती गेल्या काही दिवसांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून लाबं होती. ती लवकरच ‘बंटवारा १९४७’मधून पुनरागमन करणार आहे. आता प्रिती झिंटा राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यावर प्रिती झिंटाने प्रतिक्रिया दिली आहे.
प्रीती झिंटाने अलीकडेच आपल्या एक्स अकाउंटवर आस्क मी सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी तिला एका चाहत्याने भविष्यात राजकारणात जाणार का की नाही? असा प्रश्न विचारला आहे.
चित्रपटाच्या रिलीजपूर्वी अभिनेत्रीने आपल्या एक्स हँडल (पूर्वीचे ट्विटर)वर ‘पीजेड चॅट’ नावाने एक ‘आस्क मी’ सेशन घेतले. या सेशनच्या माध्यमातून तिने चित्रपटाशी, राजकारणात प्रवेशाशी आणि इतर अनेक गोष्टींशी संबंधित प्रश्नांची उत्तरे दिली. याचवेळी एका युजरने त्यांना भविष्यात राजकारणात जाण्याच्या त्यांच्या प्लॅनबाबत विचारले, तेव्हा तिने आपले मत मांडले.
‘आस्क मी’ सेशनदरम्यान एका युजरने प्रीतीला विचारले होते की, त्या भविष्यात राजकारणात येण्याचा विचार करत आहेत का. युजरने लिहिले होते, “तुम्ही भविष्यात कधी स्वतःला राजकारणात सामील होताना पाहता का?”
चाहत्याच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तराने प्रितीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. प्रितीने, “सध्या राजकारणात जाण्याचा कोणताही विचार नाही.”