
तुम्ही नेहमी ऐकलं असेल की भाग्यात जे लिहिलेले आहे, ते बदलता येत नाही. कर्माची फळं भोगावी लागतात. पण भाग्य बदलता येते का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. चांगले कर्म करून भाग्य बदलते का?

वृंदावनचे संत प्रेमानंद महाराज यांना असाच प्रश्न करण्यात आला. भाग्यात जे लिहिले आहे, ते बदलता येऊ शकत नाही का, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर महाराजांनी एक सरळ, सोपे उत्तर दिले.

महाराज म्हणाले की हे मनुष्य जीवन आहे. यामध्ये सर्व काही बदलता येऊ शकते. तुमच्या भाग्यात जे काही आहे ते बदलता येते. तुमच्या ग्रह नक्षत्र रुसले असतील तरी तुमचे भाग्य बदलता येते. तुमच्या चांगल्या कर्मांनी, सद्गुणांनी तुम्ही नशीब पालटवू शकता.

प्रेमानंद महाराज म्हणतात की आपल्या भाग्यात काय आहे नी काय नाही याचा अगोदर हिशोब मांडलेला आहे. त्याप्रमाणे जीवनात सुख-दुःख येते. ते भोगावे लागतात.

देवाचे नाव जपलं, देवाचं नाव घेतलं तरी तुमच्यावरील संकट दूर होईल. नामजपात मोठी ताकद असते. जितके घेता येईल तितके देवाचे नाव घ्या. कीर्तन करा. उपवास करा. चांगले मनुष्य व्हा.

प्रेमानंद महाराज म्हणाले की व्यक्ती त्यांच्या कर्माच्या आधारे संकट टाळू शकतो. त्यामुळे मानवी जीवन वाया घालवू नका. वडीलधाऱ्या मंडळींची सेवा करा. जितके समाजासाठी काम कराल. तितका तुम्हाला फायदा होईल.