
चार राज्यातील निवडणूक विजयानंतर गुजरात दौऱ्यावर गेलेले पीएम मोदी दोन वर्षांनंतर त्यांची आई हिराबेन यांना भेटले आहेत.

याआधी ऑक्टोबर 2019 मध्ये मोदी त्ंयाच्या आईला भेटले होते. त्यानंतर इतर कार्यक्रमात व्यस्त झाल्याने मायलेकाची भेट झाली नव्हती.

व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये दिसत आहे की, पंतप्रधान मोदींनी आधी आईचे आशीर्वाद घेतले आणि नंतर त्यांच्यासोबत जेवण केले.

त्यांनी आज अहमदाबादमध्ये मोठा रोड शो काढला. त्या रोड शोमध्ये प्रचंड जनसमुदाय दिसला आणि पंतप्रधान मोदींनी सर्वांचे आभार मानले.

दिवसभराचा राजकीय कार्यक्रम आटपून मोदी आईच्या भेटीला पोहोचले. त्याचेच फोटो आता सोशल मीडियावर चर्चेत आहेत.