तो सतत किस करत होता..; प्रिया बापटसोबत अभिनेत्याने ओलांडली मर्यादा, अखेर उमेशने शिकवला धडा

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सेटवर तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला. एका चित्रपटातील किसिंग सीनच्या वेळी सहअभिनेता मर्यादा ओलांडत होता, असं तिने सांगितलं. त्यावेळी उमेश तिच्या मदतीला धावून आला होता.

| Updated on: Jun 03, 2026 | 8:27 AM
1 / 6
अभिनेत्री प्रिया बापटने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शूटिंगदरम्यानचा धक्कादायक प्रसंग सांगितला. किसिंग सीनदरम्यान सहकलाकार त्याच्या मर्यादा विसरून गेला होता, असा खुलासा तिने केला आहे. ही गोष्ट इतकी पुढे गेली की अखेर प्रियाच्या पतीला म्हणजेच उमेश कामतला त्यात पुढे येऊन तिचा बचाव करावा लागला होता.

अभिनेत्री प्रिया बापटने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शूटिंगदरम्यानचा धक्कादायक प्रसंग सांगितला. किसिंग सीनदरम्यान सहकलाकार त्याच्या मर्यादा विसरून गेला होता, असा खुलासा तिने केला आहे. ही गोष्ट इतकी पुढे गेली की अखेर प्रियाच्या पतीला म्हणजेच उमेश कामतला त्यात पुढे येऊन तिचा बचाव करावा लागला होता.

2 / 6

'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत प्रियाने सांगितलं की तिचा तो पहिलाच चित्रपट होता आणि त्यामध्ये प्रियाचा एक किसिंग सीन होता. "मला त्याच्यावर तेव्हापासूनच संशय आला होता, जेव्हा मी स्क्रिप्ट वाचायला सुरुवात केली होती. मला काही समस्याही होत्या", असं ती म्हणाली.

3 / 6

याविषयी तिने पुढे सांगितलं, "मी सतत दिग्दर्शकांना विचारत होती की तुम्हाला यात किसिंग सीन का हवा आहे? मी तो सीन करायला तयार नव्हती, अशी गोष्ट नव्हती. पण त्या सीनची ती गरज असायला हवी, इतकंच माझं मत होतं. मला त्याठिकाणी किसिंग सीनची गरज होती, असं वाटत नव्हतं. कारण तो सीनच योग्य वाटत नव्हता. मी त्यांना म्हटलं की तुम्हील मला समजावून सांगा आणि जर खरंच गरज असेल तर मी करेन."

4 / 6

मात्र दिग्दर्शक किसिंग सीनवर अडून राहिल्याने अखेर प्रिया तो सीन करण्यास तयार झाली. प्रियाने सांगितलं की संपूर्ण चित्रपटात तिने फक्त एका किसिंग सीनसाठी होकार दिला होता. मात्र शूटिंगच्या वेळी अभिनेता स्वत:हून त्या सीनमध्ये भर घालण्याचा प्रयत्न करत होता, असा खुलासा प्रियाने केला.

5 / 6

"सीन शूट करताना अभिनेता मला सतत किस करत होता. का ते मला माहीत नाही, पण मी माझ्यासाठी उभी राहून तिथे बोलू शकली नाही. कारण अशा परिस्थितीला कसं सामोरं जायचं, हे मला माहीत नव्हतं. आम्ही सर्वजण एकाच हॉटेलमध्ये राहत होतो, तर तो अभिनेता मला सतत मेसेज करत होता की, मी तुला स्विमिंग शिकवतो, तुला डिनरला घेऊन जातो, आपण नाश्त्याला भेटू शकतो.. वगैरे", असं तिने सांगितलं.

6 / 6

अशा घटनेला कधी सामोरं न गेल्याने प्रियाला त्यावेळी नेमकं काय करावं ते समजत नव्हतं. ती त्या अभिनेत्याच्या सततच्या मेसेजेसने त्रस्त झाली होती. अखेर तिने वैतागून उमेशला फोन केला होता. तेव्हा उमेश तिच्यासोबत त्या हॉटेलमध्ये तीन दिवस राहिला, जेणेकरून त्या अभिनेत्याला समजावं की ती एकटी नाही आणि त्याला त्याच्या मर्यादांची जाणीव होईल. प्रियाला या गोष्टीचा धक्का बसला की, विवाहित आहे हे माहित असूनही त्या अभिनेत्याने सतत मेसेज केले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us