हा तर ‘धुरंधर 2’चाही बाप! 3 दिवसांत 1300 कोटींची कमाई; हिरोपुढे हमजाही फेल?

सध्या बॉलिवूडमध्ये बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर 2'चा डंका वाजत असला तरी असा एक चित्रपट आहे, जो रणवीरच्या या चित्रपटालाही कमाईत मागे टाकत पुढे गेला आहे. हा चित्रपट कोणता आहे, त्याने किती कमाई केली, ते जाणून घ्या..

| Updated on: Mar 25, 2026 | 12:19 PM
1 / 5
सध्या सर्वत्र 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाचीच जोरदार चर्चा आहे, कारण प्रदर्शनाच्या अवघ्या सहा दिवसांत रणवीर सिंहच्या या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे. परंतु 2 तास 36 मिनिटांचा हा दुसरा चित्रपट 'धुरंधर 2'चाही बाप ठरला आहे. कमाईच्या बाबतीत हा चित्रपट 'धुरंधर 2'च्याही पुढे निघून गेला आहे.

2 / 5
या चित्रपटाने फक्त तीन दिवसांत 1000 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे. 'धुरंधर 2'ला परदेशात झटका देणारा हा चित्रपट 'प्रोजेक्ट हेल मेरी' आहे. यामध्ये रायन गोसलिंग मुख्य भूमिकेत आहे. एंडी वियरच्या 2021 च्या नॉवेलवर आधारित हा सायन्स फिक्शन चित्रपट आहे.

3 / 5
'प्रोजेक्ट हेल मेरी' हा चित्रपट 'धुरंधर 2'च्या एक दिवसानंतर म्हणजेच 20 मार्च 2026 रोजी 83 देशांमधील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. तर भारतात हा चित्रपट 26 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.  फिल लॉर्ड आणि क्रिस्टोफर मिलर दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 60.4 दशलक्ष डॉलरची कमाई केली आहे.

4 / 5
या चित्रपटाचा जगभरातील कमाईचा आकडा 140.9 दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास 1321 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर 19 मार्च रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंहच्या 'धुरंधर 2'ने सहा दिवसांत 919 कोटी रुपये कमावले आहेत.

5 / 5
रायन गोसलिंगचा हा चित्रपट ओपनिंग वीकेंडमध्येच 2026 मधील आठवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. कमाईचा वेग पाहता तो लवकरच टॉप 5 मध्ये आपलं स्थान निश्चित करेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

Follow Us