पुरुषांना होणारा सर्वात खतरनाक कॅन्सर, सुरुवातीला समजतही नाही, पण…वाचा लक्षणं काय?

प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांना होणारा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कॅन्सर आहे. या आजारात सुरुवातीला लक्षणेच जाणवत नाहीत.

| Updated on: Jan 21, 2026 | 7:18 PM
1 / 5
आजकाल कर्करोग होण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. पुरुषांमध्ये तर प्रोस्टेट कॅन्सर होण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं सुरुवातीला दिसत नाहीत. परंतु हा कर्करोग झाल्यावर शरीराचे खूप नुकसान होऊ शकते. याच कारणामुळे प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं काय आहेत, काय खबरदारी घ्यायला हवी हे जाणून घेऊ या..

2 / 5
भारतात प्रोस्टेट कॅन्सर पुरुषांना होणारा तिसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. पहिल्या क्रमांकवर फुप्फुसाचा तर दुसऱ्या क्रमांकावर मुखाचा कर्करोग आहे. जगभरात प्रत्येक वर्षी साधारण 15 लाख लोकांना प्रोस्टेट कॅन्सर होतो.  वय वाढल्यानंतर हा आजार होण्याची शक्यता वाढते.

3 / 5
प्रोस्टेट कॅन्सरबाबत लोकांमध्ये फारच कमी जागरुकता आहे. या आजाराची लक्षणं लोकांना माहिती नाहीत. तसं पाहायचं झालं तर या आजाराची लक्षणं फारच सामान्य आहेत. त्यामुळेच अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. नंतरच्या कालावधीत मात्र हा आजार आचानक डोकं वर काढतो.

4 / 5
प्रोस्टेट कॅन्सरमध्ये सुरुवातीला लघवीचा प्रवाह कमी होतो. तसेच लघवीचा रंग लाल गुलाबी होतो. शुक्राणूंमध्ये रक्त यायला लागते, पुन्हा-पुन्हा लघवी होणे, लघवी करताना त्रास होणे अशी लक्षणं दिसतात. अशी लक्षणं दिसायला लागली की लगेच रुग्णालयात जायला हवे.

5 / 5
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं दिसू लागताच त्वरीत चाचण्या करायला हव्यात. तसेच वयाची 50 वर्षे झाल्यानंतर नियमितपणे प्रोस्टेट कॅन्सरची चाचणी करायला हवी. (टीप- ही स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. कोणताही प्रयोग करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.)