
हिवाळ्यात निरोगी राहणे अत्यंत महत्वाचे ठरते. निरोगी राहण्यासाठी आहारात काही बदल आपल्याला करावा लागेल. जर हिवाळयात आजारापासून दूर राहायचे असेल तर हेल्दी गोष्टी खाण्यावर भर द्या.

हिवाळ्यात आपल्या दररोजच्या आहारात खास ग्रीन सुपचा समावेश करा. ज्यामुळे निरोगी राहण्यास मदत होईल आणि अनेक घटक तत्व आपल्या शरीराला आरामात मिळतील.

व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम आणि फॉस्फरस यासारख्या पोषक तत्वांचा समावेश ग्रीन सूपमध्ये आहे. विशेष म्हणजे हा खास सूप तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने घरी तयार करू शकता.


भोपळा सर्वात अगोदर कुकरमध्ये उकडून घ्या. त्यानंतर मस्त फोडणी द्या आणि त्यामध्ये पाणी टाका, शिजलेल्या भोपळा मिक्स करून घ्या हा मिनिटांमध्ये हा हेल्दी सूप तयार होईल.