दिसला की तोडला, टार्गेट ऑन दी स्पॉट! पुण्यात मंदार किवळेला मारण्यासाठी वर्षभरापूर्वीच…रक्तरंजित हल्ल्याचा प्लॅन समोर!

या हल्ल्यामध्ये मंदार किवळे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसतेय. हल्ला एवढा निर्घृण होता की यात त्याचे दोन्ही हात तुटून लटकत असल्याचे दिसते. दरम्यान या हल्ल्यातील आरोपींची ओळख पटलेली आहे.

| Updated on: Nov 25, 2026 | 5:41 PM
1 / 6
पुण्यात शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी मंदार किवळे याच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. त्याच्यावर एकूण सहा जणांनी हल्ला केला. या घटनेचे हादरवून टाकणारे व्हिडीओ समोर आले आहेत.

पुण्यात शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी मंदार किवळे याच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. त्याच्यावर एकूण सहा जणांनी हल्ला केला. या घटनेचे हादरवून टाकणारे व्हिडीओ समोर आले आहेत.

2 / 6

3 / 6

या हल्ल्यामध्ये मंदार किवळे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसतेय. हल्ला एवढा निर्घृण होता की यात त्याचे दोन्ही हात तुटून लटकत असल्याचे दिसते. दरम्यान या हल्ल्यातील आरोपींची ओळख पटलेली आहे. त्यांचा शोध सुरू झाला आहे. या हल्ल्यासाठी साधारण वर्षभरापूर्वीपासूनच तयारी सुरू करण्यात आली होती.

4 / 6

शुभम चव्हाण याच्या हल्ल्याला एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेला. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी चव्हाण यांचे सहकारी यांनी या आधीच प्लॅन बनवायला सुरुवात केली होती. शुभमच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी त्याच्या मारेकऱ्यांना संपवण्याचा डाव आखला.

5 / 6

या प्रकरणात आरोपी असलेला मंदार किवळे हा चार ते पाच दिवसांपूर्वी जामीनावर तुरुंगातून बाहेर आला होता. किवळे हा बाहेर आल्या असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. त्यानुसार त्याच्यावर एक ते देऊन दिवसांपासून आरोपींनी "ट्रॅप" लावला होता.

6 / 6

किवळे हा न्यायालीन कामकाजासाठी आज शिवाजीनगर भागातील जात असताना दबा धरलेल्या आरोपींनी त्याच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार केले. संबंधित आरोपींना शोधण्यासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक सुद्धा तयार करण्यात आली आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us