Pune Mhada Lottery : पुण्यात स्वप्नातलं घर होणारच, म्हाडाने अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली, या तारखेपर्यंत संधी!

पुणे विभागातील म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करताना तांत्रिक अडचणी येत होत्या. हीच अडचण लक्षात घेऊन म्हाडाने अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेत वाढ केलीय.

| Updated on: Oct 14, 2026 | 9:45 PM
1 / 5
गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास महामंडळाच्या (म्हाडा) पुणे विभागातील घरांसाठी सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु हे अर्ज भरताना सामान्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. याच अडचणी लक्षात घेता म्हाडाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

2 / 5

पुणे विभागातील म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करताना तांत्रिक अडचणी येत होत्या. हीच अडचण लक्षात घेऊन म्हाडाने अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेत वाढ केलीय.

3 / 5

याआधी 15 ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती. परंतु आता अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. आता लोकांना येत्या 22 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील. पुणे मंडळातर्फे सध्या 4 हजार 462 घरांसाठी सोडत निघाली आहे.

4 / 5

आतापर्यंत 1 लाख 65 हजारांपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत. सध्या म्हाडाच्या घरांसाठी लाखो लोकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यामुळे महाआयटीकडे 3800 पेक्षा जास्त अधिवास प्रमाणपत्र तसेच 9000 पेक्षा जास्त उत्पन्नाचे दाखल पडताळणीसाटी प्रलंबित आहेत.

5 / 5

त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी अर्ज दाखल करून या लॉटरीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. म्हाडाच्या या निर्णयाचे सामान्यांनी स्वागत केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us