AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi: इंडिया आघातील फूट रोखण्यासाठी राहुल गांधींचा मास्टर स्ट्रोक, दिल्ली सोडून थेट एका भेटीने गेम पलटणार?

Rahul Gandhi: इंडिया आघाडीतील तणाव कमी करण्यासाठी आणि इंडिया आघाडीतील फूट टाळण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठा राजकीय डाव टाकला आहे

Rahul Gandhi: इंडिया आघातील फूट रोखण्यासाठी राहुल गांधींचा मास्टर स्ट्रोक, दिल्ली सोडून थेट एका भेटीने गेम पलटणार?
rahul gandhiImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 29, 2026 | 1:09 PM
Share

सध्या संपूर्ण देशाता डिलिमिटेशन बिलावरून वाद पेटला आहे. सत्ताधारी NDA हे विधेक मंजरून करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे लोकशाही संकटात येईल, असा दावा ‘इंडिया’ आघाडीने केलाय. या विधेयकाला इंडिया आघाडीकडून विरोध केला जात असला तरी यातील काही पक्षांनी मात्र वेगळी भूमिका घेतलीय. यामुळेच राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. इंडिया आघाडीतील हा तणाव कमी करण्यासाठी आणि इंडिया आघाडीतील फूट टाळण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठा राजकीय डाव टाकला आहे. दिल्लीत असतानाच त्यांनी थेट चेन्नईला जाण्याचा निर्णय घेतला असून, ते डीएमके प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत. या भेटीमागे मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाला विरोध करण्याची विनंती करणे हा मुख्य उद्देश आहे.

राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, “‘इंडिया’ आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि मी, थिरू एम. के. स्टॅलिन यांची भेट घेण्यासाठी चेन्नईला जात आहोत. आम्ही त्यांना आणि द्रमुक पक्षाला विनंती करणार आहोत की, त्यांनी मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकांना विरोध करावा.” त्यांनी स्टॅलिन यांचा ‘बंधू’ असा उल्लेख करत आपुलकी व्यक्त केली आहे.

राहुल गांधी यांच्या मते, लोकसभेतील जागांची संख्या ८५० पर्यंत वाढवणे म्हणजे भारतातील लोकशाहीचा अंत ठरेल. यामुळे भाजप-आरएसएसला देशाचा संपूर्ण निवडणूक नकाशा त्यांच्या फायद्यासाठी पुन्हा आखण्याची अमर्याद संधी मिळेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांनी स्टॅलिन यांच्या भूमिकेची प्रशंसा करताना म्हटले आहे की, ते नेहमीच तामिळविरोधी शक्तींच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिले आहेत. राष्ट्रीय हित, तामिळनाडूचे हित आणि राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी एकत्र येऊन या विधेयकाचा पराभव करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

डीएमकेने यापूर्वी सुधारित मतदारसंघांच्या पुनर्रचना विधेयकाच्या काही तरतुदींना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. राहुल गांधी यांच्या या अचानक चेन्नई दौऱ्याला याच पार्श्वभूमीवर महत्त्व प्राप्त झाले आहे. दिल्ली सोडून थेट स्टॅलिन यांची भेट घेण्याचा त्यांचा हा प्रयत्न आघाडीतील मतभेद दूर करण्यासाठीचा ‘मास्टर स्ट्रोक’ मानला जात आहे.

संसदेच्या विशेष अधिवेशनात सादर करण्यात येणाऱ्या सुधारित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या (Delimitation Bill) समर्थन करण्याच्या निर्णयावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसने केलेल्या टीकेला द्रमुकने सडेतोड उत्तर दिले होते. द्रमुकच्या खासदार कनिमोझी यांनी शनिवारी “अनेक पक्ष असा प्रश्न उपस्थित करत आहेत की एखाद्या विशिष्ट विधेयकाचे समर्थन करणे म्हणजे भाजपसोबत युती करणे आहे. याच पक्षांनी भाजपचे समर्थन केले होते, जेव्हा त्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) १० टक्के आरक्षणाचे विधेयक आणले होते. विशेषतः कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसनेही त्या विधेयकाला पाठिंबा दिला होता. जर अशीच गोष्ट असेल, तर आपण असे म्हणू शकतो का की काँग्रेसने भाजपसोबत युती केली आहे?” असे म्हणत भूमिका मांडली.

Follow Us
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक...
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा!
शरद पवारांच्या NCP ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे...
शरद पवारांच्या NCP  ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे; काँग्रेस नेत्याचे पुन्हा आवाहन!
बारामतीच्या पॉवर मॅरेथॉनमध्ये अजितदादांची आठवण; दत्तात्रय भरणे भावुक,
बारामतीच्या पॉवर मॅरेथॉनमध्ये अजितदादांची आठवण; दत्तात्रय भरणे भावुक, सुनेत्रा पवारांचेही केले कौतुक!
आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा...
आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा अमित शाहांना सवाल
मोठी बातमी! समाजवादी पक्षाचा खासदारांना व्हिप, तीन विधेयकांविरोधात...
मोठी बातमी! समाजवादी पक्षाचा खासदारांना व्हिप, तीन विधेयकांविरोधात मतदानाचे आदेश