
हॉलिवूड अभिनेता लियोनार्डो डिकॅप्रियो हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे लियोनार्डो डिकॅप्रियो हा एका पंजाबी मॉडेलला डेट करत असल्याचे सांगितले जातंय.

पंजाबी मॉडेल नीलम गिल ही हॉलिवूड अभिनेता लियोनार्डो डिकॅप्रियो याला डेट करत आहे. नुकताच यांना लंडनमध्ये स्पाॅट केले गेले आहे. नीलम गिल हिच्या आज्जी आणि आजोबांचा जन्म भारतामध्ये झाला आहे.

नीलम गिल हिचे वय 28 असून लियोनार्डो डिकॅप्रियो याचे वय 48 आहे. नीलम गिल हिने स्वत: ला इंस्टाग्रामवर ब्रिटिश पंजाबी मॉडेल असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर नीलम गिल ही चांगलीच सक्रिय दिसते.

नीलम गिल हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. नीलम गिल ही तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. नीलम गिल हिचा जन्म इंग्लॅंड येथे झाला आहे.

नीलम गिल हिचे नाते पंजाबशी आहे. यापूर्वी नीलम गिल हिने लियोनार्डो कॅमिला मोरोन याला देखील डेट केले आहे. आता नीलम गिल हिचे नाव लियोनार्डो डिकॅप्रियो याच्यासोबत जोडले जात आहे.