सर्वांत शिस्तबद्ध स्टारकिड, पटकावले 5 गोल्ड मेडल्स; अभिनेताही भारावला

अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांत माधवन हा प्रोफेशनल स्विमर आहे. भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकण्याचं त्याचं स्वप्न आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माधवन त्याच्या मुलाच्या सवयींबद्दल आणि शिस्तबद्ध स्वभावाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला.

| Updated on: Jul 15, 2025 | 8:22 AM
1 / 5
'रहना है तेरे दिल में', '3 इडियट्स' आणि 'तनु वेड्स मनु' यांसारख्या चित्रपटांमधील दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता आर. माधवन नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या मुलाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. 'जीक्यू'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने मुलगा अत्यंत शिस्तप्रिय असल्याचा खुलासा केला.

2 / 5
"प्रेक्षक जरी अभिनयाच्या बाबतीत माझं कौतुक करत असले तरी आमच्या कुटुंबात सर्वांत शिस्तप्रिय माझा मुलगा वेदांत आहे. तो कडक शिस्तीचं पालन करतो. तो प्रोफेशनल स्विमर असल्याने रोज पहाटे 4 वाजता म्हणजेच ब्रह्ममुहूर्ताला उठतो आणि रात्री 8 वाजता झोपतो", असं माधवनने सांगितलं.

3 / 5
"यासाठी खूप मेहनत लागते आणि ही मेहनत फक्त तोच नाही तर आईवडील म्हणून आम्हालाही करावी लागते. ब्रह्ममुहूर्ताला उठणं काही सोपी गोष्ट नाही. अध्यात्मानुसार, त्या वेळेत उठण्याचे खूप फायदे आहेत. वेदांतसाठी जेवणं हासुद्धा एक व्यायाम आहे", असं तो पुढे म्हणाला.

4 / 5
मुलाच्या सवयींबद्दल त्याने सांगितलं, "तो फक्त जेवायला बसत नाही, तर अन्न नीट चावून खाण्यावर आणि जेवणाच्या संतुलनावरही तो विशेष लक्ष देतो. दैनंदिन जीवनातील छोट्यातल्या छोट्या गोष्टी तो अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करतो. त्याच्याइतकी शिस्त माझ्यातही असायला पाहिजे, असं मला वाटतं. कारण मी खूप आळशी आहे."

5 / 5
आर. माधवनचा मुलगा वेदांतने मलेशियाई ओपनमध्ये पाच वेळा सुवर्णपदक जिंकलं आहे. तर डॅनिश ओपनमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावलं आहे. लातविया आणि थायलँड ओपनमध्ये त्याने कांस्य पदक आपल्या नावावर केलं आहे.