कामासाठी मी अनेक गोष्टी केल्या…मराठमोळ्या अभिनेत्रीचे विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाली?
मराठमोळी बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने एक विधान केले आहे आता ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. ती असं नेमकं काय म्हणाली आहे ते पाहा...

मराठमोळी बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेचे विधान आता चर्चेत आले आहे. तिने एका मुलाखतीत सिनेमात काम करताना आलेल्या अनुभवाबद्दल बोलून दाखवले आहे.
लवकरच तिच्या 'अक्का' या महिला केंद्रस्थानी असलेल्या गँगस्टर सीरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सहज अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या राधिकाने अभिनयाविषयीच्या आपल्या बदललेल्या दृष्टिकोनाबद्दल बोलून दाखवले आहे. 'अभिनयाची आवड आजही आहे; पण पूर्वीसारखी त्यासाठीची धडपड आणि भूक आता मात्र उरलेली नाही', असं तिने बोलबन दाखवले.
राधिका हसत म्हणाली, 'माझ्यातली काम करण्याची भूक आता संपली आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. कामाच्या भुकेपोटी मी अशा अनेक गोष्टी केल्या, ज्या आता मला करण्यात रस नाही. पूर्वी एखाद्या कामाला नकार देणं मला कठीण जायचं; आता मात्र नाही म्हणणं अगदी सोपं झालं आहे. "
"आजही माझं माझ्या कामावर तितकेच प्रेम आहे. अभिनय करताना मला आजही तितकाच आनंद मिळतो. पण पूर्वी अशी मानसिकता होती की काहीही करून काम मिळवायचंच. त्यासाठी अनेकदा विना मोबदलाही काम केलं, एखाद्या व्यक्तीसोबत काम करण्यासाठी किंवा एखादी भूमिका मिळवण्यासाठी मी तडजोड करायला तयार असायचे. आता मात्र तसे काही राहिलेलं नाही."
दरम्यान, राधिका पुन्हा एकदा एका नव्या आणि अत्यंत वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. बहुचर्चित क्राइम-थ्रिलर सीरिज 'अक्का' (Akka) मध्ये राधिका मुख्य भूमिकेत दिसणार आहे.