
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे काही दिवसांपूर्वीच प्री वेडिंग फंक्शन हे गुजरातमध्ये पार पडले. या फंक्शनला देश आणि विदेशातून पाहुणे पोहचले होते. या फंक्शनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

या प्री वेडिंग फंक्शनमध्ये अंबानींची होणारी सून अर्थात राधिका मर्चंट हिने एकदम राॅयल लूकमध्ये एंट्री मारली. राधिका मर्चंट हिच्या लूकची जोरदार चर्चा ही देखील रंगताना दिसली.

यावेळी राधिका मर्चंट हेवी पीच कलरच्या लेहेंग्यात दिसली. यावेळी राधिका मर्चंट हिने एक ओढणी घेतली होती, आपला चेहरा त्या ओढणीने झाकताना राधिका मर्चंट ही दिसली.

तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की, ज्या ओढणीने राधिका मर्चंट ही आपला चेहरा झाकताना दिसत आहे, ती ओढणी अशी तशी नसून चक्क सोन्याच्या धाग्यांनी तयार करण्यात आलीये.

या ओढणीची किंमत कोट्यवधी रूपये असल्याचे देखील सांगितले जातंय. राधिका मर्चंट ही बिझनेसमॅन बिरेन मर्चंट यांची मुलगी असून अनंत अंबानीची लहापणीपासूनची मैत्रीण देखील आहे.