
महाराष्ट्रत रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद रित्या आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली होती. यानंतर रायगडाच्या समुद्र किनाऱ्यावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आली आहे.

या घटनेनंतर मुंबईसह रायगड जिल्ह्यात हाय अर्लट देण्यात आला आहे. पोलिसांना ही बोट ताब्यातघेण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर मच्छीमारांना ही बोट आढळून आली होती. यामध्ये एके 47 च्या 3 रायफल तसेच रायफल दारूगोळा व कागदपत्रे अधून आली आहेत.

ही बोट ऑस्ट्रेलियन नागरिकाची असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ही युरोपला जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रात बोटीचे इंजिन खराब झाल्याने कोरियन बोटीने लोकांना बाहेर काढण्यात आले.

याघटनेनंतर श्रीवर्धन (रायगड) च्या आमदार आदिती तटकरे यांनी घटनेची दाखल घेत सरकारने एटीएस किंवा स्टेट एजन्सीचे विशेष पथक तातडीने नेमावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

अद्याप कोणत्याही अनुचित प्रकार तसेच कटाची पुष्टी झालेली नाही. मात्र घटनेनंतर समुद्र किनाऱ्यावरील बंदोबस्तात वाढ केली आहे. पोलिसांना हाय अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे.