
रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

rrcmas.in या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. ही भरती रेल्वे लेवल 1 आणि लेवल 2 साठी स्काउट्स अॅन्ड गाइड कोट्यातून केली जातंय.

या भरती प्रक्रियेतून दक्षिण रेल्वेमध्ये 14 पदे आणि आयसीएफमध्ये 3 पदे भरली जाणार आहेत. उमेदवारांना या भरती प्रक्रिेयेसाठी परीक्षा द्यावी लागेल.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 400 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. उशीर न करता उमेदवारांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

20 फेब्रुवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग फटाफट करा अर्ज.