Train Ticket : रेल्वेचे सर्वात स्वस्त तिकीट किती रुपयांना मिळते? जाणून चकीत व्हाल
रेल्वे प्रवास सर्वात सुरक्षित प्रवास मानला जातो. या रेल्वेचे सर्वात स्वस्त तिकीट किती रुपयांना मिळते, जाणून घेऊयात.

भारतातील विविध भागात प्रवाशांसाठी रेल्वेगाड्या चालवल्या जातात. रेल्वेचा प्रवास सर्वसामान्यांना परवडणारा मानला जातो. परंतु काही तिकीट दराची तुलना विमानाच्या तिकीटदराशी केली जाते. याच रेल्वेच्या सर्वात स्वस्त तिकीट दराविषयी जाणून घेऊया.
Image Credit source: tv9
- भारतातील विविध भागात प्रवाशांसाठी रेल्वेगाड्या चालवल्या जातात. रेल्वेचा प्रवास सर्वसामान्यांना परवडणारा मानला जातो. परंतु काही तिकीट दराची तुलना विमानाच्या तिकीटदराशी केली जाते. याच रेल्वेच्या सर्वात स्वस्त तिकीट दराविषयी जाणून घेऊया.
- रेल्वेचे सर्वात तिकीट दर हे जनरल डब्याचे आहे. त्याला सेकंड क्लास ऑर्डिनरी सर्व्हिसेस देखील म्हटलं जाते. तसेच पॅसेंजर ट्रेनचे तिकीट दर देखील कमी असते.
- पॅसेंजर ट्रनच्या जनरल डब्यातून कमी अंतराच्या प्रवासाचे केवळ 10 रुपये तिकीट आकारले जाते. खरंतर किमान भाडे 10 रुपये इतके आहे. त्याआधी तिकीट दर अवघे 5 रुपये होते. 2015 साली वाढवून 10 रुपये करण्यात आले.
- रेल्वेचे तिकीटर दर श्रेणीनुसार बदलतात. सुपरफास्ट, मेल एक्स्प्रेस, राजधानी, गरीब रथ एक्स्प्रेसचे तिकीट दर हे प्रति किलोमीटरमागे वेगवेगळे आहे. भारतात रेल्वे सेवांमध्ये पॅसेंजर, एक्स्प्रेस आणि सुपफास्ट गाड्यांचा समावेश होतो.
- सुपरफास्ट ट्रेनचे तिकीट किमान दर 45 रुपये इतके असते. तर एक्स्प्रेसचे सुमारे किमान तिकीट दर 30 रुपये इतके आहे. पॅसेंजर ट्रेनचे भाडे 10 रुपयांपासून सुरू होते.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us